अभिनेत्री आलिया भट्टला ऍनिमल-प्रेंडली फॅशन इंडस्ट्रीच्या पाठिंब्याकरता काम केल्याबद्दल पेटा 2021 ने ‘पर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी निवडले आहे. आलियाने अलिकडेच मंदिरात वाहण्यात आलेल्या फुलांपासून वीगन लेदर तयार करणाऱया कंपनीत गुंतवणूक केली आहे. याचबरोबर आलियाचा ब्रँड एड-मम्माने देखील 2021 चा पेटा इंडिया फॅशन अवॉर्ड पटकाविला आहे. हा ब्रँड मुलांना प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण देतो.

आलिया मांजरं आणि श्वान यासारख्या प्राण्यांबद्दल सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करताना दिसून येते. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्यावरून ती आवाज उठवत असते. आलियाने प्रो अडॉप्शन पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स (पेटा) इंडिया कॅम्पेनमध्येही काम केले आहे. ही संस्था मांजर, श्वान यासारख्या प्राण्यांसाठी काम करते.
आलिया भट्ट वीगन फॅशनला चालना देण्यास मदत करत आहे. तसेच नव्या पिढीला प्राण्यांबद्दल प्रेम आणि दयेची भावनाही वाढवत असल्याचे उद्गार पेटा इंडियाचे जनसंपर्क अधिकारी सचिन बंगेरा यांनी काढले आहेत.









