उपनगराध्यक्षपदी कॅरोज प्रुझ
प्रतिनिधी / सांगे
सांगे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रभाग 9 मधून निवडून आलेल्या श्वेता सुप्रज नाईक तारी तर उपनगराध्यक्षपदी प्रभाग 7 मधून निवडून आलेले कॅरोज प्रुझ यांची सहा विरुद्ध चार मताने अनुक्रमे निवड झाली आहे. या दोघांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे झाली आहे. दोघेही सहा विरुद्ध चार मतांनी अनुक्रमे नगराध्यक्ष आणि उपनगराधक्ष पदासाठी निवडून आले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी भाजप पुरस्कृत स्वेता सुप्रज नाईक तारी तर विरोधी गटाकडून फौंझिया शेख यांनी नामांकन सादर केले होते. उपनगराधक्ष पदासाठी भाजपच्यावतीने कॅरोज प्रुज व विरोधकाकडून मेशू डिकॉस्ता यांनी अर्ज भरला होता.
या नंतर झालेल्या निवडणुकीत 6 विरुद्ध 4 मताने नगराधक्षपदी श्वेता तारी आणि उपनगराधक्षपदी कॅरोज प्रुज यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली आहे. फौंझिया व मेशू यांना प्रत्येकी चार मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप नाईक तर सहाय्यक म्हणून सांगे पालिकेचे मुख्याधिकारी मनोज कोरगावकर यांची काम पहिले.
सहा जणांच्या गटात नगराध्यक्ष स्वेता तारी, उपनगराध्यक्ष केरोज क्रूज, नगरसेवक इकबाल सय्यद, नगरसेविका अर्चना गावकर, प्राची नाईक व संतिक्षा गडकर यांनी मतदान केले तर विरोधी गटात नगरसेवक रुमाल्डो फर्नांडिस, नगरसेविका फौजिया शेख, नगरसेवक मेशु डिकॉस्ता व संगमेश्वर नाईक यांनी मतदान केले. तत्पूर्वी सर्व नगरसेवकाना शपथ देण्यात आली.
सांगे नगरपालिकेवर भाजपचा झेंडा
सांगेचे आमदार प्रसाद गावकर तसेच माजी आमदार सुभाष फळदेसाई आणि जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराधक्षांचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांचे समर्थक उपास्थित होते.
दहा प्रभाग असलेल्या सांगे नगरपालिकेत भाजप पुरस्कृत पांच नगरसेवक निवडून आले असून प्रभाग दहा मधील अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेविकेने आपला पाठिंबा भाजपला दिल्याने भाजपाची संख्या सहावर पोचली आहे. तर अन्य चारजण अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
आत्ता राजकारण संपले असून प्रत्यक्ष पालिकेच्या कामकाजावर पालिका मंडळाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आत्ता या पालिका मंडळाच्या कार्याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.









