227 जण तंदुरुस्त. दिवसभरात केवळ 35 कोरोना बाधीत. तालुक्मयाच्या बाबतीत शुभ वार्ता.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयात गेल्या काही दिवसांमध्ये झपाटय़ाने वाढलेले कोरोनाचे प्रस्त हळूहळू आटोक्मयात येत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्मयात सध्या 1795 सक्रीय रूग्ण असून सोमवारी केवळ 35 नवीन कोरोना बाधीतांची भर पडली आहे. चांगली बातमी म्हणजे दिवसभरात 227 कोरोनाबाधीत रूग्ण तंदुरुस्त झाले आहेत. सध्या कोवीड इस्पितळात आणि कोवीड निगा केंद्रात डिचोली तालुक्मयातील एकही रूग्ण नसल्याचे अहवालात दिसून येत आहे.
सोमवारी केवळ 35 नवीन रूग्ण
गेले अनेक दिवस संपूर्ण राज्यात आणि गावागावांमध्ये दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे भीतीच्या छायेखाली असलेल्या डिचोली तालुक्मयातील लोकांना दिलासादायक अशी हि वार्ता आहे. डिचोली तालुक्मयातील डिचोली सामाजिक आरोग्य केंद्र, साखळी सामाजिक आरोग्य केंद्र आणि मये प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे लोकांची कोरोना चाचणी घेतली जाते. दररोज या केंद्रांवर मोठय़ा रांगा चाचणी करण्यासाठी आलेल्या लोकांच्याच दिसून येतात. त्यामध्ये काल सोमवारी केवळ 35 रूग्ण सापडणे हि दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे सध्या डिचोली तालुक्मयात तरी कोरोना आटोक्मयात येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
सोमवारी 227 रूग्ण कोरोनामुक्त
रवि. दि. 9 रोजी डिचोली तालुक्मयातील सक्रिय रूग्णांची संख्या 1987 इतकी होती. परंतु सोमवारी थेट 227 जण कोरोनातून बरे झाल्याने सध्या सक्रिय रूग्णांची संख्या 1795 इतकी झाली आहे. त्यामुळे सकारात्मक रूग्ण आढळण्याच्या तुलनेत बरे होण्याची टक्केवारी कितीतरी पटीने जास्त आहे. सोमवारी डिचोली मतादारसंघात 17 व मये मतादरसंघाय 18 सकारात्मक रूग्ण आढळून आले आहेत. साखळीत एकही सकारात्मक रूग्णाची नोंद झालेली नाही. सोमवारी डिचोली मतदारसंघातील 84 रूग्ण तर मये मतदारसंघातील 143 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजच्या तारखेत डिचोली मतदारसंघात 770, मये मतदारसंघात 494, तर साखळी मतदारसंघात 531 रूग्ण कोरोना सक्रिय आहेत. हे सर्व रूग्ण घरातच विलगीकरणात आहेत. सध्या या तालुक्मयातील एकही रूग्ण कोवीड निगा केंद्र किंवा कोवीड इस्पितळात भरती नाही.
परिस्थिती सुधारत असली तरी काळजी घेणे गरजेचे – डॉ. सरोज देसाई.
राज्यात सध्या सर्वत्र पसरलेला व्हायरस हा घातक आहे. आज जरी रूग्णांची संख्या आमच्या परिसरात कमी होताना दिसत असली तरी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना बाधीत रूग्ण कमी झाले म्हणून लोकांनी बिनधास्तपणे वावरणे योग्य नव्हे. आज सर्वत्र भयावह वातावरण असले तरीही लोक बाजारात आणि इतर ठिकाणी सामान खरेदीसाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाने सर्वांना गर्दी न करता सामाजिक सुरक्षा अंतर पाळण्याची शिस्त लावली आहे, त्या शिस्तीप्रमाणे सर्वां?नी वागावे. तसेच स्वतः लसीकरणासाठी पुढे यावे आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी करून घ्यावी, असे आवाहन साखळी सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राच्या देखरेख समिती अध्यक्षा डॉ. सरोज देसाई यांनी केले आहे.









