प्रतिनिधी / पणजी
सामाजिक बांधिलकी या उपक्रमाअंतर्गत वाहन तसेच बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या प्रायोरिटी उद्योग समुहातर्फे संचालक परिंद नास्नोडकर व स्वप्नील नास्नोडकर यांच्याहस्ते पणजी महानगर पालीकेचा नुतन महापौर रोहीत मोन्सेरात यांच्याकडे गवत कापणी यंत्र प्रदान केले. यावेळी बोलताना परिंद नास्नोडकर म्हणाले की सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत पणजी परिसरातील पावसाळय़ापूर्वीची कामे उरकण्यासाठी तसेच पणजी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी आपल्या उद्योगसमुहातर्फे हा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. पणजी शहराच्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपला हा खारीचा वाटा आहे असे त्यांनी नमुद केले.
नुतन महापौर राहीत मोन्सेरात यांनी पायोरिटी उद्योग समुहाचे आभार मानताना इतर उद्योग समुहानेही पुढे येऊन पणजी शहर तसेच परिसराचा विकास करावा या विकासाच्या वाटचालीत एकत्र येण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. या कोवीडच्या काळात देखील पणजी मनपाने पावसाळय़ापूर्वीची सर्व कामे पूर्ण केली आहे. असेही त्यांनी नमुद केले.









