सांखळी प्रतिनिधी :
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने व सांखळीतही रुग्ण सापडल्याने गुरुवारी रात्री सांखळी व्यापारी संघटनेने स्वखुशीने सांखळी बाजारपेठ शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवार असे चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित सर्व व्यापाऱयांना कळविण्यात आले असल्याची माहिती सदस्य पियुष डांगी यांनी दिली.
गुरुवारी रात्री घेण्यात आलेल्या या निर्णयावेळी अध्यक्ष सत्यवन काणेकर, पियुष डांगी, संदीप काणेकर, रुपेश काणेकर, शिवप्रसाद, प्रसाद पाऊसकर, विनय पांगम, नगरसेवक आंनद काणेकर व इतरांची उपस्थिती होती.









