नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संक्रमितांची संख्या सलग वाढत आहे. सोमवारी सकाळी आरोग्य खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात 18 हजार 599 नवीन रुग्ण आढळले आहेत. सलग तिसऱया दिवशी हा आकडा 18 हजारांच्या पार गेला आहे. तसेच< दिवसभरात 14,278 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून 97 जणांनी जीव गमावला आहे. नव्या बाधितांच्या तुलनेत डिस्चार्जची संख्या कमी असल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. देशात आता एकूण 1 लाख 88 हजार 747 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत देशात 1 कोटी 12 लाख 29 हजार 398 इतक्या जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यापैकी 1 कोटी 8 लाख 82 हजार 798 इतके रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तसेच 1 लाख 57 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला.









