तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता ज्युनियर एनटीआर छोटय़ा पडद्यावर लवकरच झळकणार आहेत. ज्युनियर एनटीआर आता ‘मिलो इवारू कोटीश्वरदू’ शोच्या 5 व्या सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. हा शो कौन बनेगा करोडपतीचे तेलगू वर्जन आहे. हिंदीत अमिताभ बच्चन यांकडून होस्ट करण्यात येणाऱया या शोची लोकप्रियता तेलगूतही राहिली आहे. यापूर्वी सुपरस्टार चिरंजीवी आणि नागार्जुन यांनीही हा शो होस्ट केला आहे.
शोच्या पाचव्या सीझनच्या स्वरुपात काही बदल करण्यात आले आहे. हा शो जेमिनी टीव्हीवर पाहता येणार आहे. केबीसीच्या तेलगू वर्जनसह ज्युनियर एनटीआर सध्या एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे बजेट 450 कोटी रुपयांचे आहे. आरआरआरमध्ये ज्युनियर एनटीआरसह सुपरस्टार रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण, रे स्टीवेंसन आणि ऑलिविया मॉरिसही दिसून येणार आहे. तमिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळमसह ज्युनियर एनटीआरचा ‘आरआरआर’ विदेशी भाषांमध्येही 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









