प्रतिनिधी/ सातारा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. 8 मार्च रोजी उम्मीद फाऊंडेशनची स्थापना धर्मादाय आयुक्त सातारा येथे अफसाना देवाणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा अफसाना देवाणी यांनी महिलांविषयी काम करण्याचा मानस असून त्यातून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी धर्मादाय निरीक्षक प्र.र.येवले यांच्या हस्ते देवाणी यांना ऍड. एस.व्ही.होनराव, प्रियांका नामदास, लेखपाल देवरे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले. उम्मीद फाऊंडेशनच्या व बुदरानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत नेत्र तपासणी शिबीर सकाळी 10 ते 2 यावेळेत पाटील दवाखाना येथे आयोजन केले आहे.








