केरळमधील अत्याधुनिक आरोग्य केंद्र
सरकारी आरोग्य केंद्राचा विचार मनात आल्यावर त्याच्या दुरवस्थेची आठवण होते. देशात दुर्गम भागांमधील आरोग्य केंद्रांची स्थिती कुणापासूनच लपून राहिलेली नाही. पण केरळमधील एका आरोग्य केंद्राचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे छायाचित्र कालिकत येथील नारीकट्टामधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आहे. सोशल मीडियावर या आरोग्य केंद्राची तुलना उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांशी केली जात आहे. छायाचित्र पाहिल्यास केरळमधील प्राथमिक आरोग्य केंद्र एखाद्या हॉटेलपेक्षा कमी वाटत नाही. अशा आरोग्य केंद्रात उपचार करून घेण्यास कुणीच टाळाटाळ करू शकत नाही. तर उर्वरित देशातील प्राथमिकच नव्हे तर जिल्हा रुग्णालयांची अवस्था पाहिल्यास तेथे उपचार करवून घेणे सर्वसामान्यांच्या जीवावर येते. नाइलाजास्तव लोकांना अशा आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करवून घ्यावे लागतात.

केरळमधील आरोग्य व्यवस्था देशात सर्वोत्तम असल्याचे कोरोना काळात पुन्हा ठळकपणे समोर आले आहे. केरळने कोरोना संकट अत्यंत उत्तमप्रकारे हाताळले आहे. केरळ मॉडेलचे अनुकरण अन्य राज्यांनीही करणे गरजेचे आहे.









