130 कॅमेऱयांसह वनाधिकारी जंगलात, वाघांच्या नोंदी सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
व्याघ्रगणनेच्या पहिल्या, दुसऱया टप्प्यातील गणती संपवून तिसऱया टप्प्यातील गणतीला प्रारंभ होणार आहे. वनखाते, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारण व भारतीय वन्य जीवन संस्था यांच्यामार्फत खानापूर वन्यप्रदेशातील भीमगड, लोंढा, नागरगाळी, कणकुंबी, जांबोटी आदी भागात गणतीची मोहीम सुरू आहे. याकरिता विशेष 130 कॅमेऱयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
वनखात्याच्या टीमने सेन्सर, टॅक व सीसीटीव्ही कॅमेरे लावून वन्यप्रदेश पिंजून काढला आहे. कॅमेरे, पायांचे ठस्से आणि वि÷ा यावरून वाघांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. शिवाय दर चार वर्षांनी वाघांची गणती केली जाते. पण कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून व्याघ्रगणना लांबणीवर पडली होती. वनखात्यामार्फत व्याघ्रगणतीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात बेळगाव विभागातील एकूण वाघांची संख्या समोर येणार आहे. मध्यंतरी वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली होती. त्यामुळे वाघांची संख्या वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिवाय वाघांची शिकार आणि इतर गोष्टीवर निर्बंध घातले आहेत.
बेळगाव विभागातील खानापूर वनप्रदेशात गतवषी 11 वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले होते. अलीकडे वनक्षेत्रात वाढ झाल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान हरीण, चितळ, काळवीटसह इतर वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याने त्यांच्यावर उपजीविका करणाऱया वाघांची संख्या वाढली आहे. गणतीद्वारे इतर प्राण्यांची संख्या व इतर माहिती मिळणार आहे.









