हापूस मार्केटमध्ये उपलब्ध, दर आवाक्मयाबाहेर
प्रतिनिधी / बेळगाव
फळांचा राजा हापूस बेळगाव बाजारात दाखल झाला आहे. मागील काही दिवसांपासून किरकोळ प्रमाणात आंब्यांची आवक झाली आहे. आंब्यांच्या काही मोजक्मया पेटय़ा प्रुट मार्केटमध्ये दाखल होत आहे.
सध्या हापूसचा दर प्रतिडझन 2 हजार रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. आता हळूहळू हापूस दाखल होत असला तरी मार्चपासून आवक वाढण्याबरोबर मागणी वाढेल, शिवाय आंब्याचा दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्मयात येईल, अशी माहिती होलसेल विपेत्यांनी दिली.
आंब्याच्या सिझनमध्ये कोकणातून मोठय़ा प्रमाणात आंबा विक्रीसाठी येतो. कोकणातील मालवण, वेंगुर्ला आणि रत्नागिरी येथून अधिक प्रमाणात आवक होत असते. मात्र आंब्याच्या सिझनला प्रारंभ झालेला नाही. शिवाय आवक देखील कमी आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे आंबा हंगामावर मोठा परिणाम झाला. आंबा उत्पादकांबरोबर विपेत्यांनाही फटका बसला. त्यामुळे यंदा तरी आंबा विक्री सुरळीत होईल, अशी आशा विपेत्यांना आहे. नावाजलेल्या कोकणातील आंब्याची बेळगाव बाजारात अधिक विक्री होत असते. त्यामुळे हापूसला मागणी देखील अधिक असते. मात्र अद्याप आवक कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.









