अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 11 फेब्रुवारी, सकाळी 11.45
● 24 तासात जिल्ह्यात 97 बाधित
● तिसऱ्या लाटेत पहिल्यांचा आकडा शंभरच्या खाली
● पॉझिटिव्हीटी रेट 4.09 पर्यंत घसरला
● 2369 संशयितांच्या चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
शुक्रवारचा दिवस जिल्ह्यासाठी सुखद ठरला. आज सकाळी आलेल्या कोरोना आकडेवारीच्या अहवालात रूग्णवाढीचा आलेख कमालीचा घसरला. तिसरी लाट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच रूग्णवाढ शंभरच्या आत म्हणजे 97 पर्यंत आली. आजची आकडेवारी जिल्हावासियांसाठी समाधान वाढवणारी आहे. गेल्या 24 तासात 2369 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी फक्त 97 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 4.09 पर्यत खाली आला आहे.
जिल्ह्यात तिसरी लाट ओसरतेय
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रूग्णवाढीची घसरण कमी जास्त वेगाने सुरू आहे. यातच शुक्रवारी 2369 संशयितांच्या चाचण्या झाल्या असताना फक्त 97 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तिसरी लाट ओसरत असल्याचे संकेत हे आकडे देत आहेत.
उन्हाळ्याची चाहूल, वातावरणात बदल
जिल्ह्याच्या काही भागात थंडी कायम असून कधी कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर कधी थंडी पडत आहे. वातावरणात गेल्या दोन दिवसात वारंवार बदल होत आहेत. कडाक्याची थंडी कमी होत असल्याने सर्दी, खोकल्यांच्या आजारावरही मर्यादा आल्या आहेत असे अनेक वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.
शुक्रवारी जिल्ह्यात
नमुने-2369
बाधित-97
शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने-25,20,838
बाधित-2,78,557
मृत्यू-6,629
मुक्त-2,66,679









