नीलेश काब्राल यांचे केजरीवालांना आव्हान
प्रतिनिधी /पणजी
दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते गोव्यात येत असतील तर वीज प्रकरणावर वादविवाद करायला तयार आहे, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केजरीवाल यांना उघड आव्हान दिले आहे. गोव्यात वीज मोफत देणे शक्य नाही. गोमंतकीयांना मोफत विज देण्याचे गाजर दाखविण्या अगोदर दिल्ली सरकार वीज निर्मिती कंपनीचे 2 हजार कोटी रुपये थकबाकी आहे त्याचा विचार करावा. गोवा सरकार जनतेसाठी अनेक योजना राबवित आहे, असेही काब्राल म्हणाले.
शुक्रवारी पर्वरी येथे आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काब्राल बोलत होते. केजरीवाल यांनी गोमंतकीयांना मोफतपणाचे गाजर दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये. दिल्लीची परिस्थिती काय आहे त्याच्या बातम्या सोशल मीडियावरून तसेच वर्तमानपत्रातून प्रसिध्द होत आहेत ते अगोदर पहावे. एका बाजूने मोफत विज म्हणून सांगणे आणि दुसऱयाबाजूने लोकांची लुट करणे असा हा प्रकार आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेने सावत रहावे. असे निलेश काब्राल यांनी गोमंतकीयांना आवाहन केले आहे.
गोव्यात सर्व स्तरावरील लोकांना विज सवलत मिळते
दिल्लीत 300 युनीट पर्यंत केजरीवाल सरकार विज मोफत देत आहे. दिल्लीतील झोपट पट्टीत रहाणाऱया लोकांना केवळ 300 युनीट पर्यंत विज पुरेसी आहे. मात्र जे लोक 300 युनीटपेक्षा जास्त विजेचा वापर करीत आहे त्यांची लुट केली जात आहे. 6 रुपयेपेक्षा अधिक प्रती युनीट बिल आकारले जाते त्याचे काय असा प्रश्न काब्राल यांनी उपस्थित केला आहे. गोव्यात सुरुवातीच्या 200 युनिटपर्यंत 1.40 पैसे प्रती युनिट आकारले जातात तर 200 पेक्षा अधिक युनिट विजेचा वापर केला जातो त्यांना 4 प्रती युनिट बिल आकारले जाते. शिवाय वेळोवेळी विजनिर्मित कंपनीचे बिले भरली जातात त्यामुळे गोव्याला विशेष सवलत दिली जाते. सर्व स्तरावरील लोकांना विज सवलत दिली जाते. एकूणच दिल्लीपेक्षा गोव्यात विज स्वस्त आहे. असेही काब्राल यांनी सांगितले.
गोमंतकीयांना हव्या असलेल्या योजना सरकार राबवित आहे
गोव्याच्या रहाणीमानाप्रमाणे गोमंतकीय सर्रासपणे 300 युनिटपेक्षा अधिक विजेचा वापर करीत असतात. गोव्यात अनेक परप्रांतीयांची घरे असून त्यात अधिकाधिक दिल्लीवासीय आहे. ते केवळ सुट्टीची मजा लुटण्यासाठी गोव्यात येत असतात त्यांना 300 युनिट विज पुरेशी असते. केजरीवाल विजबाबत जी योजना राबविण्याची घोषणा करीत आहेत ती गोमंतकीयासाठी नव्हे तर परप्रांतीयांसाठी आहे. गोव्यात लोक 24 तास विजेचा वापर करीत असतात त्यामुळे असेही काब्राल यांनी सांगितले. ज्या योजना गोमंतकीयांसाठी गरजेच्या आहेत त्या योजना गोवा सरकार राबवित आहे. राज्यात लोक 24 तास विजेचा वापर करीत असतात त्यांना 300 युनिट मोफत विज मिळणार मात्र त्याच्या वरील युनिटचे बिल किती आकारले जाईल याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे.









