- रविवारी 9 हजार नवे रुग्ण; 180 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कमी होणारी दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काल पुन्हा एकदा वाढ झाली आहे. हा बदल चिंतेत भर घालणारा आहे. रविवारी राज्यात 9,000 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 5,756 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 180 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 80 हजार 350 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,54,81,252 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,14,190 ( 13.66 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,67,585 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,066 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 03 हजार 486 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : सध्या 6,544 रुग्णांवर उपचार सुरू

मुंबईत मागील 24 तासात 454 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 512 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,31,161 वर पोहचली असून त्यातील 7,06,552 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,702 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 1,001 दिवस इतका आहे.








