प्रतिनिधी/ बेळगाव
कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डचे काम ठप्प झाल्याने अनेकांना रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. अनेकांनी बीपीएल रेशनकार्डसाठी अर्ज केले आहेत. अशांना रेशन पुरवठा करण्याचा सूचना अन्न व नागरी पुरवठा खात्याने केल्या आहेत.
लॉकडाऊन काळात अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. याकरिता केंद्र सरकारने 5 किलो अतिरिक्त तांदूळ देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेला याचा लाभ होत आहे. नवीन रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्यांना अद्याप रेशनकार्ड मिळाले नाही. मात्र अशा लाभार्थ्यांनी अर्ज केलेली प्रत दाखविल्यास रेशन पुरवठा करण्याची सूचना खात्याने केली आहे.
सध्या कडक लॉकडाऊनमुळे बाहेर किराणा माल व रेशन मिळणे देखील अवघड बनले आहे. अशा काळात शासनाचा मोफत पुरवठा अनेकांना आधार ठरत आहे.









