वृत्तसंस्था/ सिंगापूर
एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रातील येथे होणारी सिंगापूर एफ-वन ग्रा प्रि मोटार शर्यत कोरोना महामारी समस्येमुळे सलग दुसऱयावर्षीं रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
एफ-वन मोटार रेसिंग 2021 हंगामातील विविध ठिकाणी होणाऱया शर्यतीवर कोरोना समस्येमुळे साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. कॅनडा, जपान, ब्राझील, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलिया येथे होणाऱया एफ-वन ग्रा प्रि मोटार शर्यतीचे भवितव्य अधांतरी आहे. गेल्यावर्षी कोरोना समस्येमुळे सिंगापूरमधील एफ-वन मोटार रेसिंग स्पर्धा रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा सलग दुसऱयावर्षी या महामारीमुळे सदर स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे,. ऑस्ट्रेलियातील एफ-वन स्पर्धा नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.









