प्रतिनिधी/ बेळगाव
बदलत्?ाा हवामानामुळे रविवारी बेळगावसह परिसरात रिमझिम पाऊस बरसला. ?ाा पावसासोबत मराठी-हिंदी गीतांची सुंदर मैफल रसिकांना अनुभवता आली. भावगीत, भक्तिगीत, लावणी, चित्रपटगीत सादर करून सांगली येथील गायिका गीता दातार यांनी उपस्थितांची मने जिंकली.
गुरुवर्य मो. ग. कुंटे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी टिळकवाडी येथील वरेरकर नाट्या संघाच्या सभागृहात ‘गीत सुधा’ ही संगीत मैफल रसिकांना ऐकता आली. मराठीसह हिंदी गीतांचाही समावेश या मैफलीमध्ये करण्यात आला होता.
प्रारंभी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गीता दातार व प्रसाद दातार यांच्या हस्ते मो. ग. कुंटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राहुल सोलापूरकर यांनी लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. मोगरा फुलला, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असा अभंग, चित्रपट गीत, भक्तिगीत, भावगीतांची मैफल रंगली.
गीता दातार यांना अविनाश इनामदार, केदार सांभारे, विवेक पोतदार, किरण ठाणेदार, प्रसाद दातार या वाद्यवृंदांची साथ लाभली. निवेदिका शुभदा पाटणकर यांनी अप्रतिम निवेदन करून कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. सूत्रसंचालन माधव कुंटे यांनी केले. बेळगाव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.









