वार्ताहर/ खडकलाट
चिखलव्हाळ ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱया रामपूर येथील वॉर्ड क्र. 5 आणि 6 मधील ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ग्रामविकास पॅनेलच्या बॅलेट पेपरचे पूजन करून देवी-देवतांचे दर्शन घेतले. आरती करून, विधिवत पूजा करून देवी-देवतांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर रामलिंग मंदिरासमोर ज्ये÷ नागरिक तात्यासाहेब बंकापुरे, सुनील संकपाळ, महादेव जाधव, महादेव मुरगुंडे आणि सूरज कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शशिकांत नेसरे म्हणाले, माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून रामपूर गावात गेल्या पाच वर्षांमध्ये कोटय़वधी रुपयांची कामे झालेली आहेत. त्यामुळे आता होणाऱया पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्र. 5 मधून रेखा उमेश तांदळे, विश्वजीत मलगोंडा पाटील यांची तर वॉर्ड क्र. 6 मध्ये अलका गोविंद पोवार, शशिकांत मारुती मदने आणि सुमित्रा अशोक मुरगुंडे यांच्यासह पॅनेलला निवडून द्यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी ज्ये÷ नागरिक तात्यासाहेब बंकापुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.









