केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची ट्वीटरवर माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
मागील वर्षी राज्यात उद्भवलेल्या पुरामुळे मोठय़ा प्रमाणात पीक हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटकासाठी 629 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी सोमवारी ट्वीटरवर ही माहिती दिली. केंद्राने सदर निधी एनडीआरएफद्वारे दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठी देखील 701 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
2020 मध्ये राजस्थानमध्ये दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या मदतीसाठी एनडीआरएफसाठी 113 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. 2020-21 मधील खरीप आणि रब्बी हंगामातील पीक नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील 11.43 लाख शेतकऱयांना प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत 750 कोटी रुपये पीक विमा देण्यात आला आहे, अशी माहिती शोभा करंदलाजे यांनी दिली आहे.









