प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्रीपदाचा येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचा चाहता असलेल्या एका शेतकऱयाने आत्महत्या केली आहे. चामराजनगर जिल्हय़ाच्या गुंडलुपेठ येथे ही घटना घडली आहे. राजप्पा (रवी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. या घटनेबद्दल येडियुराप्पा यांनी शोक व्यक्त केला. तसेच राजकारणात चढ-उतार ही साहजिकच बाब आहे. त्यासाठी प्राणाचा त्याग करण्याच्या घटनांचे समर्थन करणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अभिमानाचा चाहत्यांनी कधीही अतिरेक करू नये. रवी याच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण साहभागी आहे, असेही ते म्हणाले.









