प्रतिनिधी /बेंगळूर
नशिबानेच मी दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री झालो आहे, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले. रामनगरच्या चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कुमारस्वामी पुढे म्हणाले, आगामी दिवसात निजदला चांगले भविष्य असल्याचा विश्वास आपल्याला आहे. नशिबानेच मी दोनवेळा मुख्यमंत्री मुख्यमंत्री झालो. जनतेच्या आशीर्वादामुळे आपण मुख्यमंत्री झालेलो नाही. चामुंडेश्वरी देवी माझ्या हाती सत्ता देईल. राज्यात जनतेच्या हितासाठी निजद पक्ष यापुढे काम करणार आहे. राज्यात निजद पक्षाचे आव्हान संपुष्टात आले असल्याचे म्हणणाऱयांना आगामी दिवसात उत्तर मिळेल, असे त्यांनी सांगितले.
भाजपच्या नूतच्या मुख्यमंत्री निवडीविषयी बोलताना ते म्हणाले, तो त्यांच्या पक्षातील आंतरिक विचार असून त्याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींचा लाभ उठविण्याचा विचार नाही. जनतेच्या विकासाबाबत सरकार विचार करावा, असेही ते म्हणाले.









