प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर संपावर गेलेले एसटीच्या कर्मचाऱयांची कामावर येण्याची संख्या वाढताना दिसत आह़े आतापर्यंत रत्नागिरी विभागातील 730 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत़ तर मंगळवारी रत्नागिरी विभागातून एसटीच्या एकूण 400 फेऱया सोडण्यात आल्य़ा यामध्ये तब्बल 20 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीच्या सेवेचा लाभ घेतल़ा
रत्नागिरी विभागात एसटीचे प्रशासन, कार्यशाळा, यांत्रिकी, चालक-वाहक असे मिळून 3 हजार 679 कर्मचारी आहेत़ एसटी विलिनीकरणाच्या मुद्यावर हे सर्व कर्मचारी संपावर गेले होत़े मात्र आता महिन्यानंतर एसटीचे कर्मचारी कामावर परतू लागले आहेत़ मंगळवारी सायंकाळपर्यंत 730 कर्मचारी कामावर हजर राहिले आहेत़ यामध्ये 88 कर्मचारी हे अधिकृत सुट्टीवर असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आल़े
हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये प्रशासकीय 257, कार्यशाळा 202, चालक 74, वाहक 72, चालक तथा वाहक 37 अशा 642 कर्मचाऱयांचा समावेश आह़े एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याने रत्नागिरी विभागातून गाडय़ा सोडण्यासही सुरूवात झाली आह़े मंगळवारी जिह्याच्या विविध आगारातून 400 फेऱया सोडण्यात आल्य़ा या फेऱयांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आह़े मंगळवारी 20 हजार प्रवाशांनी एसटीच्या फेऱयांचा लाभ घेतल़ा









