नवी दिल्ली
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ही संख्या 15 कोटीवर पोहचली असल्याची माहिती आहे. ताज्या आकडेवारीनुसार मंगळवारी 15.31 कोटीहून अधिक जणांनी ई-श्रम पोर्टलवर नेंदणी केली असल्याचे समजते. देशभरातील नोंदणीत युवकांची टक्केवारी अधिक असल्याचे सांगितले जाते. 61 टक्के श्रमिक हे 18 ते 40 वयोगटातील आहेत.









