नाटोवरून तणाव : अमेरिकेला लेखी आश्वासन देण्याची सूचना
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनला एक लाखांहून अधिक रशियन सैनिकांनी तीन दिशांनी घेरले ओ. रशियन घेराव आणि युक्रेनवर हल्ल्याच्या शक्यतेदरम्यान जिनिव्हामध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱया दिवशीही कोंडी कायम राहिली. रशियाचे उपविदेशमंत्री रायबाकोव्ह यांनी अमेरिकेचे उपविदेशमंत्री वेंडी शर्मन यांच्यासमोर एक सूत्री अट ठेवली. अमेरिकेने युक्रेनला सैन्य संघटना नाटोमध्ये सामील करू नये असे रशियाचे म्हणणे आहे.
अमेरिकेसोबत स्पष्ट तोडगा इच्छितो असे रशियाचे म्हणणे आहे. रशिया नाटो सैन्याला स्वतःच्या सीमांपासून दूर ठेवू इच्छिते. अमेरिकेने सध्या युक्रेनला नाटोमध्ये समील करण्याचे कुठलेच आश्वासन दिलेले नाही. रशियन सैन्याने युक्रेनला पूर्वेला सोलोटी आणि बोगुचार तर उत्तरेला पोचेप येथून घेरले आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या सीमेवर स्वतःच्या सैन्याची तैनात वाढवत आहे.
भारताकडे मध्यस्थीची संधी
प्राध्यापक चार्ल्स कप्शन हे अमेरिकेच्या वॉल्श स्कुल ऑफ फॉरेन सर्व्हिस अँड डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत आहेत. या तणावाच्या स्थितीत भारताकडे पाश्चिमात्य देश आणि रशिया यांच्यात मध्यस्थीची संधी आहे. अमेरिकेने निर्बंध लादल्यास रशिया चीनच्या दिशेने झुकू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. रशियावर निर्बंधा लादले गेल्यास भारताला सुखोई विमानासह अन्य सैन्य उपकरणांचे सुटे भाग मिळविण्यास अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.
युरोपची दुखरी नस निर्बंधांच्या स्थितीत प्रत्युत्तरादाखल रशिया युरोपला होणारा गॅस पुरवठा रोखू शकतो. यामुळे अमेरिकेचे सहकारी युरोपीय देश प्रभावित होणार आहेत. युरोपला 40 टक्के गॅस पुरवठा रशियाकडून केला जातो.









