वृत्तसंस्था/ लंडन
युक्रेनचा टेनिसपटू स्टॅनिस्लेव्ह पोपालेव्हस्की याच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या इंटीग्रेटी विभागाने आजीवन बंदी घातल्याची घोषणा केली आहे. टेनिस क्षेत्रात मँचफ्क्सींग प्रकरणामध्ये पोपालेव्हस्कीचा सहभाग असल्याचे आढळून आले.
2015 ते 2019 या चार वर्षांच्या कालावधीत टेनिस क्षेत्रातील मँचफिक्सींगच्या अनेक प्रकरणामध्ये त्याचा सहभाग असल्याचे तपासणी मोहिमेत आढळून आले. युक्रेनच्या या टेनिसपटूवर आता आजीवन बंदी घालण्यात आली असून त्याला 10 हजार डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे.









