वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
पाकचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱयात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 18 डिसेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होईल. या मालिकेसाठी पीसीबीने 18 जणांचा संघ जाहीर केला असून अनुभवी आणि वयस्कर यष्टीरक्षक सर्फराज अहमद आणि अष्टपैलू हुसेन तलतचे पुनरागमन झाले आहे.
अष्टपैलू हुसेन तलतने आपला शेवटचा टी-20 सामना गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकाविरूद्ध खेळला होता. झिंबाब्वे मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलेल्या माजी कर्णधार सर्फराज अहमदचे पाक संघात पुनरागमन झाले आहे. बाबर आझमकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
पाकचा टी-20 संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, अब्दुल्ला शफीक, फहीम अर्श्रफ, हैदर अली, हॅरीस रॉफ, हुसेन तलत, इफ्तिकार अहमद, इमाद वासीम, के. शहा, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हेसनेन, मोहम्मद मुसा खान, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, शाहीन अफ्रिदी, उस्मान कादीर, वहाब रियाज.









