मोरजी/ प्रतिनिधी
आजची महिला आर्थिक दृष्टय़ा सक्षम व्हायला पाहिजे. समाज्यात महिलेला माणूस म्हणून वागवले पाहिजे. प्रत्येकजणाला आपल्या घरात आई, मावशी, सून, सासू पाहिजे मात्र मुलगी नको असते अशी आजच्या समाजाची धारणा झाली आहे ती धारणा बदलणे अत्यंत आवश्यक आहे. असे उदगार मराठी चित्रपट श्रुस्टी तिल अभीनेत्री भार्गवी चिरमुरे हिने काढले.
मोरजी येथे मादे मतदारसंघातिल महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ’स्रित्त्व’ या फलखाखाली युवा नेते जित आरोलकर यांनी महिला दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी अभेनेत्री भारगवी चिरमुरे व्यासपीठावरून बोलत होता त्यांच्या सोबत व्यासपीठावर मगो पक्षाचे ढवळी मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर, उधोजक तथा मादे मतदारसंघाचे मगो पक्षाचे संभाव्य उमेदवार जित आरोलकर, केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे, असविता मान्द?कर, सुभाष आसोलकर, गुणाजी ठाकूर, प्रवीण वायगणकर, अमरोस फेर्ना?डिस, प्राची भिवशेठ, वंदना शेठगावकर, दयानंद मान्द?कर व अंजीला प्रभुदेसाई उपस्थित होते. अभेनेत्री भारगवी चिरमुरे हिने पुढे बालताना सांगितले की, राजकारण हे देशाचा एक अविभाज्य भाग आहे, राजकारण हे आपला देश घडविण्याचे काम करत आहे, राजकारण करत असताना निस्वार्थी भावना असणे गरजेचे आह. असे केल्यास समाज सर्व बाबतीत पुढे येऊ शकतो असे उदगार अभेनेत्री भारगवी चिरमुरे यांनी सांगितले.
महिला दिनाच्या औचित साधून मादे मतदार संघातील मोरजी गावातील 340 महिलांनी मगो पक्षात प्रवेश मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर याना सादर करणेत आले. यावेळी महिला मोटय़ा संख्येने उपस्थित होत्या.
सुदिन ढवळीकर
मगो पक्ष गोव्यात का स्थापन झाला. त्याच उदिष्ट काय हे आजच्या पिढीतील युवकांना माहीत नाही, भाऊ साहेबांनी कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर असे अनेक चांगले कायदे आणले, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक अशी शिक्षणाची गंगा गोव्यात आणली त्यांना रोजगार मिळावा या उदेशाने औधोगिक वसाहती स्थापन करण्यात आले त्याची आजही फळे गोव्यातील जनता खात आहे.
राघोबा गावडे
आता पर्यंत पुरुषांच्या मागे महिला होती मात्र आता महिला पुरुषांच्या बरोबरीने पुढे येत आहे. मादे मतदान संघात आज 340 महिला एकाजवेळी मगो पक्षात प्रवेश करत आहे हे सुद्धा एक चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगून , गोव्यात काँग्रेस व भाजप पक्षाने कुठली नीतिमूल्ये, आदर्श लोकांपुढे ठेवले नाही, त्यासाठी येणाऱया काळात मगो पक्ष मादे मतदारसंघात पुन्हा एकदा गत वैभव प्राप्त जित आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली करेल अशी आशा व्यक्त केली.
जित आरोलकर
’स्रित्त्व’ हे नाव यापुढे मादे मतदारसंघात नावारूपाला येणार आहे. राजकारणी निवडणुका जवळ आल्याकी महिलांची आठवण करत असतो मात्र मादे मतदारसंघात ’स्रित्त्व’ या संस्थे मार्फत अनेक सोय सवलती महिलांना उपलब्ध करून महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगितले.
सुरवातीला महिलांसाठी खेळाचे आयोजन करण्यात आले होते, ज्या महिलांनी क्रमांक पटकावला त्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन स्वगत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सिंथीया गावकर हिने केले तर आभार प्राची भिवशेठ यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









