- सद्य स्थितीत 48,406 रुग्णांवर उपचार सुरू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,516 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 18 लाख 94 हजार 839 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.98 % आहे.

दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 94 हजार 977 वर पोहचली आहे. सध्या 48 हजार 406 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 523 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.54 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 38 लाख 95 हजार 277 नमुन्यांपैकी 19 लाख 94 हजार 977 (14.36%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 18 हजार 058 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 996 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.








