मगो पक्षाला मयेत नवचैतन्य मिळणार. मगोच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश. मयेतील मगोचे उमेदवार.
डिचोली/प्रतिनिधी
मये वायंगिणी पंचायतीचे पंचसदस्य तथा मयेतील एक युवानेते माजी सभापती स्व. अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट हे आज बुध. दि. 10 नोव्हे. रोजी संध्या. 4 वा. मयेचे त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात मगो पक्षात प्रवेश करणार आहे. तशी माहिती त्यांनीच दिली असून हा कार्यक्रम कुंभारवाडा मये येथील श्री सातेरी मंदिराच्या सभामंडपात होणार आहे.
या कार्यक्रमास मगो पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री दीपक ढवळीकर, माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर, डिचोलीचे माजी आमदार तथा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नरेश सावळ, मगोचे नेते जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर व इतरांची उपस्थिती लाभणार आहे.
पंचसदस्य प्रेमेंद्र शेट हे गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मये मतदारसंघात रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांचा केवळ 128 मतांच्या फरकाने पराभव झाला होता. व भाजपचे उमेदवार शंकर चोडणकर हे विजयी झाले होते. मये हा भाजपचा जरी बालेकिल्ला समजला गेला तरी जिल्हा पंचायत निवडणुकीत 128 मतांच्या फरकाने भाजपला निसटता विजय मिळाला होता. हा निकाल झाल्यानंतर भाजपच्या मयेतील बळावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर प्रेमेंद्र शेट यां?नी आपल्या कामाचा दबदबा मये मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये कायम राखताना आपल्या कामाचा मोठा विस्तार केला आहे.
मये मतदारसंघात प्रेमेंद्र शेट हे मगो पक्षाच्या उंबरठय़ावर असल्याचे मतदारसंघात सर्वत्र बोलले जात होते. ते मगो पक्षात बऱयाच काळापूर्वी प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मगो पक्षातर्फे त्यांना प्रवेश करण्यासाठी दारे उघडीच ठेवली होती. मात्र त्यांनी पक्षात प्रवेशासाठी विलंब लावला. आता त्यांनी मगो पक्षात प्रवेश करण्याचा निश्चय पक्का केला आहे. त्यामुळे मगो पक्षाला मये मतदारसंघात प्रेमेंद्र शेट यांच्या स्वरूपात उमेदवार मिळणार आहे.









