अजय देवगण अन् तब्बूचा चित्रपट
अजय देवगणच्या चित्रपटांची शैली मागील काही काळापासून प्रेक्षकांना पसंत पडत आहे. ‘दृश्यम 2’नंतर चाहते आता अजयचा चित्रपट ‘भोला’ची प्रतीक्षा करत आहेत. अजयच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवभक्त अजय या ट्रेलरमध्ये चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करताना दिसून येत आहे. चित्रपटातील अन्य कलाकार अमाला पॉल आणि तब्बू देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दमदार ऍक्शन आणि प्रभावी डायलॉग असून हा चित्रपट पूर्णपणे करमणूक करणारा असल्याचे बोलले जात आहे. यात ऍक्शन, रोमांच, ड्रामा आणि इमोशनल अँगल आहे. चित्रपटात पुन्हा एकदा अजय अन् तब्बूची केमिस्ट्री दिसून येत आहे. यापूर्वी दृश्यम 2 या चित्रपटात दोघेही एकत्र दिसून आले होते. तसेच दीपक डोबरियालचा अभिनय देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अमाला पॉल, किरण कुमार, गजराज राव, संजय मिश्रा हे कलाकार देखील यात दिसून येत आहेत.
भोला हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटात कार्थीने मुख्य भूमिका साकारली होती. तर भोला या चित्रपटाचे दिग्दर्शक अजयनेच केले आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बू एका पोलीस अधिकाऱयाच्या तर अजय देवगण कैद्याच्या भूमिकेत आहे. दीपक डोबरियाल यात खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.









