प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समिती संचलित भारती विद्यालय हायस्कूल खासबाग येथे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. पृथ्वीक व डॉ. रामा पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाबद्दलची माहिती देवून घ्यावयाची दक्षता याची माहिती दिली.
क्षयरोग बरा होतो. मात्र वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे सात्विक आहार घेतला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला एस. बी. मगदूम, जी. एस. बॅकुट, एस. बी. कुंभार, सुधीर मानकोजी, लक्ष्मण नाईक, एस. एन. हुनशीकट्टी, किरण सामजी उपस्थित होते. सुत्रसंचालन आणि आभार जी. एस. बॅकुट यांनी मानले.









