प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद, बेळगाव जिल्हा यांच्यावतीने बेळगाव बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला. जालगार मारुती मंगल कार्यालय, चव्हाट गल्ली, बेळगाव येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदचे महानगर अध्यक्ष ऍड. ए. एम. पाटील होते.
सुरुवातीला बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. सचिन शिवण्णावर, जनरल सेपेटरी ऍड. गिरीश पाटील, जॉईंट सेपेटरी ऍड. बंटी कपाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्षत्रिय मराठा परिषदचे जिल्हाध्यक्ष आमदार अनिल बेनके उपस्थित होते.
प्रारंभी अमर येळ्ळूरकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते ऍड. कलमेश मायाण्णाचे, ऍड. भुजंग बिळगोजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके आणि ऍड. ए. एम. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य ऍड. महांतेश पाटील, ऍड. अभिषेक उदोशी, ऍड. आदर्श पाटील, ऍड. इरफान बयाल, ऍड. पी. के. पवार, महिला प्रतिनिधी ऍड. पूजा पाटील यांचादेखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्ये÷ वकील प्रफुल्ल टपालवाले, ऍड. सोमनाथ जायाण्णाचे, ऍड. सुहास जोडगुंडे, ऍड. भरत जाधव, ऍड. नारायण खनगावकर, ऍड. शरद देसाई, ऍड. श्रीकांत पवार, ऍड. लक्ष्मण पाटील यांच्यासह इतर वकील उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. अनिल सांबरेकर यांनी केले तर ऍड. यल्लाप्पा दिवटे यांनी आभार मानले.









