नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन येथे होणाऱया मित्रत्वाच्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यासाठी प्रमुख प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांनी सोमवारी 23 सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा केली.
राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाचे वास्तव्य जमशेदपूरमध्ये आहे. आता हा संघ संयुक्त अरब अमिरातला 2 ऑक्टोबरला प्रयाण करणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाचे दोन मित्रत्वाचे सामने संयुक्त अरब अमिरात आणि टय़ुनिशिया संघाबरोबर खेळविले जाणार आहेत. या सामन्यानंतर भारतीय महिला फुटबॉल संघ बहरीनला प्रयाण करेल. बहरीनमध्ये हा संघ 10 ऑक्टोबरला बहरीन संघाबरोबर तर त्यानंतर 13 ऑक्टोबरला चिनी तैपेई संघाबरोबर सामने खेळणार आहे. या दौऱयासाठी भारतीय महिला फुटबॉल संघाला झारखंडमध्ये तब्बल एक महिन्यासाठी सराव शिबीर आयोजित केले होते.
भारतीय महिला फुटबॉल संघ- गोलरक्षक- आदिती चौहान, मैबम लिंथोइनगम्बी देवी, श्रेया हुडा, बचावफळी- दलिमा छिब्बर, स्वीटी देवी, रितु राणी, आशालता देवी, रंजना चानू, मिचेल कॅस्तान्हा, मनिषा पन्ना, ऍस्टम ओरॉन, मध्यफळी- संगीता बसफोर, इंदुमती कथिरेसन, संजु, मार्टिना टी., आघाडीफळी-दांगमेई ग्रेस, अंजू तमंग, संध्या रंगनाथन, सौम्या गुगुलोथ, मनिषा कल्याण, सुमती कुमारी, प्यारी झाझा आणि रेणु.









