मिस्ट्री-थ्रिलरयुक्त सीरिजचा टीजर सादर
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन डिजिटल पदार्पणासाठी सज्ज आहे. रवीनाने स्वतःची पहिली सीरिज ‘अरण्यक’चा टीजर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अरण्यक ही एटमोसफेरिक सीरिज असून जी हिमालयातील एका प्राचीन दंतकथेचा खुलासा करते. या सीरिजमध्ये रवीनाने एका पोलीस अधिकाऱयाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच यात आशुतोष राणा हे देखील झळकणार आहेत.

ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजमध्ये परमव्रत चटर्जी देखील दिसणार आहे. रॉय कपूर फिल्म्स आणि रमेश सिप्पी एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. तर विनयन वैकुल यांनी दिग्दर्शन केले आहे. सीरिजच्या टीजरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याचबरोबर रवीना लवकरच केजीएफ-2 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.









