सध्या सर्व कामकाज पोलंडमधून चालणार ः पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक
कीव्ह / वृत्तसंस्था
रशिया- युक्रेन युद्धादरम्यान, भारत सरकारने युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरते पोलंडमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या पश्चिम भागातील बिघडलेली परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचदरम्यान रविवारी युपेन-रशिया युद्धाची परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेत भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतला. तसेच सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चर्चा केली. तसेच खार्किव्हमध्ये मारल्या गेलेल्या भारतीय नवीन शेखरप्पा याचे पार्थिव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. बैठकीत पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन गंगा’चाही आढावा घेतला. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, एनएसए अजित डोवाल आणि परराष्ट्र व्यवहार आणि अर्थमंत्र्यांचे अनेक वरि÷ अधिकारी उपस्थित होते. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.
17,000 हून अधिक भारतीय मायदेशी
‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत भारताने युपेनमधून 17,000 हून अधिक लोकांची सुटका केली आहे. यासोबतच नेपाळ आणि बांगलादेशातील काही लोकांची सुटका करून त्यांना युपेनमधून आणण्यात आले. ऑपरेशन गंगा यशस्वी करण्यासाठी सरकारने आपले चार मंत्री युपेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये पाठवले होते.









