अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 13 मार्च 2022, सकाळी 11.00
● तीन तालुक्यात केवळ 6 जण बाधित
● 586 जणांची स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हीटी 1.02 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोनाला हद्दपार करण्याचे आरोग्य विभागाचे काम सुरू आहे. त्यामध्ये यश येत असून लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल अशी आशा लागून राहिली आहे. नव्याने होणारी बाधित वाढ ही दहाच्या खाली आली असून रविवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात तब्बल तीन तालुक्यात 6 जण बाधित आढळून आले तर दिवसभरात 586 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. 1.02 इतका पॉझिटिव्हीटी रेट आहे.
आठ तालुके निरंक
जिल्ह्यातील सर्वच 11 तालुक्यातील आता परिस्थिती पूर्णपणे कोरोनामुक्तीची झालेली आहे. नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ही दहाच्या आतमध्ये असून आज सकाळी जाहीर झालेल्या अहवालात केवळ तीन तालुक्यातील बाधित संख्या 6 आहे. तर इतर आठ तालुक्यात निरंक आहेत. त्यामध्ये कराड तालुक्यात 3, खंडाळा तालुक्यात 1 आणि फलटण तालुक्यात 2 आढळून आले आहेत. त्यामुळे लवकरच सर्व तालुके निरंक होण्याच्या मार्गावर आहेत.
586 जणांची स्वॅब तपासणी
जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या ही आता कमी होऊन कोरोना मुक्तीच्या दिशेने प्रवास सुरु आहे. दहाच्या आतमध्ये ही बाधित वाढ आलेली आहे. दरम्यान, 586 जणांची स्वॅब तपासणी काल दिवसभरात करण्यात आली. त्यामध्ये केवळ 6 जण बाधित आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात 25 लाख 62 हजार 893 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
रविवारी
नमुने-586
बाधित-6
रविवारपर्यंत
नमुने-25,62,813
बाधित-2,79,149
मृत्यू-6681
मुक्त-2,71,710









