ऑनलाईन टीम / बगदाद :
इराकच्या इर्बिल प्रांतातील अमेरिकन दुतावासावर इराणने शनिवारी रात्री 12 क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप अमेरिकेच्या संरक्षण खात्याकडून करण्यात आला आहे. अमेरिकन दूतावासाची ही इमारत नवीन असून अलीकडेच येथील कर्मचारी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या परिसरात आग लागून मोठी वित्तहानी झाली आहे.
इर्बिलचे गव्हर्नर ओमाद खोश्नाव यांनी सांगितले की, इराणने इर्बिलमध्ये 12 क्षेपणास्त्रे डागली आहेत. ही क्षेपणास्त्र अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला लक्ष्य करुन डागण्यात आली की शहरातील विमानतळ त्यांच्या निशाण्यावर होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या हल्ल्यात मोठी वित्तहानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या हल्ल्याबाबत अधिक तपशील उघड झाला नाही.सोशल मीडियावर क्षेपणास्त्र हल्ल्याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.









