चालू आर्थिक वर्षासंदर्भातील अंदाज : वर्ल्ड बँकेसोबत एनएसओची आकडेवारी
नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय जीडीपी वृद्धीसह दोन मोठे अंदाज व्यक्त केले आहेत. यामध्ये जवळपास एक टक्के अंतर राहिले असल्याचे दिसून येत आहे. वर्ल्ड बँक (आयबीआरडी) च्या जीडीपी वाढीचा अंदाज 8.3 टक्के जवळपास आहे. तर एनएसओ ने आकडेवारीतून चालू आर्थिक वर्षात भारताची जीडीपी वृद्धी हि 9.2 टक्के राहण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
वर्ल्ड बँकेने आर्थिक वर्ष 2022 साठी भारतीय जीडीपी वाढीचा अंदाज हा 8.3 टक्केच्या बरोबर ठेवला आहे. वर्ल्ड बँकेने आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2024 साठी भारताचा आपला अंदाज वाढवून 8.7 टक्के तर 6.8 टक्के केला आहे.
वर्ल्ड बँकेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस अहवालानुसार भारताच्या जीडीपीसह अन्य अंदाज व्यक्त केले आहेत. वर्ल्ड बँकेने हा अंदाज अशावेळी आला आहे, की भारत सरकारने अगोदरच या संदर्भात अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर हा 9.2 टक्के राहणार असल्याचे भाष्य केले आहे.
ग्लोबल वाढीचा दर कमी
वर्ष 2021मध्ये ग्लोबल वाढीचा दर हा 5.5 टक्के राहिला आहे. यामध्ये वर्ष 2022 मध्ये यात घसरण येण्याचे संकेत दिले आहेत. तसेच 4.1 टक्के राहणार असल्याची शक्यता आहे. वर्ष 2023 मध्ये हा दर घटून 3.2 टक्के राहण्याचे संकेत आहेत.
एनएसओचे संकेत
एनएसओने भारताच्या जीडीपीवर लिहले आहे, की मुल्यानुसार पाहता भारताचा रियल जीडीपी वर्ष 2021-22 मध्ये 147.54 लाख कोटी राहणार असल्याचे संकेत मांडले आहेत, तर या अगोदर 31 मे 2021 रोजी वर्ष 2020-21 साठी सादर केलेल्या प्रोव्हिजनल एस्टीमेटमध्ये हा अंदाज 135.13 लाख कोटी रुपये होता. तसेच 2021-22 मध्ये रियल जीडीपी वाढीचा दर हा 9.2 टक्के राहणार असल्याची शक्यता आहे.









