वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासाबाहेर शनिवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. हा गोंधळ पाहून दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या वक्तव्यावर जे. पी. नड्डा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेस मानसिक दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप अध्यक्षांच्या निवासाबाहेर शनिवारी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सायंकाळी सोडून देण्यात आले. तसेच कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नड्डा यांच्या निवासाला अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यात आली होती.









