22 पासून पारायण सोहळा, 28 रोजी सांगता
वार्ताहर/किणये
अष्टे येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरसमोर नुकताच झाला. किरण कित्तूर यांच्या हस्ते मुहूर्तमेढचे पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष झाला. दि. 22 र्मापासून पारायण सोहळय़ाला प्रारंभ होणार आहे. पारायणाचे यंदाचे 27 वे वर्ष असून सात दिवस पारायण होणार आहे.
पहाटे 4 वाजता काकड आरती, 6.30 वाजता ध्वजवंदन, त्यानंतर ग्रंथवाचन, सायंकाळी 6.30 वाजता प्रवचन, रात्री 9 वाजता कीर्तन निरूपण असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
सोहळ्याला हभप कृष्णा चौगुले यांचे अधिष्ठान तर हभप नागेश सुभानजी यांचे उपअधिष्ठान राहणार आहे. दि. 22 रोजी गणपत बाबू गावडे यांचे प्रवचन व परशराम कुरंगी यांचे कीर्तन होणार आहे. दि. 23 रोजी हनुमंत अप्पा नाईक यांचे प्रवचन व कीर्तन, दि. 24 रोजी आळंदी येथील आनंद महाराज जाधव यांचे प्रवचन व कीर्तन, दि. 25 रोजी पंढरपूर येथील ज्ञानेश्वर पाटील महाराज यांचे प्रवचन व कीर्तन, दि. 26 रोजी भानुदास तळेकर महाराज यांचे प्रवचन व कीर्तन, दि. 27 रोजी करमाळा येथील विठ्ठल पाटील महाराज यांचे प्रवचन व कीर्तन होईल.
दि. 28 रोजी या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. हभप नागेश शुभांगी यांचे सकाळी 10 वाजता कालाकीर्तन होणार आहे. त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा होईल. भाविकांसाठी दुपारी महाप्रसाद आहे. सर्वांनी या पारायणाचा लाभ घ्यावा, असे कळविले आहे.









