राज्य सरकारचे संकेत : कोरोना संसर्ग वाढत असल्याने कठोर भूमिका घेणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे 7 जूननंतर आणखी कठीण लॉकडाऊन जारी करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरानाबाधितांचा आकडा आणखी मोठय़ा प्रमाणात असेल, अशी भीती तज्ञांच्या समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे बेंगळूर शहरात 6 जुलैनंतर 12 दिवसांचे कडक लॉकडाऊन जारी होण्याची स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
बेंगळूर शहरात मागील आठवडय़ापासून बेंगळूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या इतर जिल्हय़ांपेक्षा तिप्पट आहे. आमागी दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची भीती कोविड टास्क फोर्सने दिली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस प्रतीक्षा करा. नंतर कठोर लॉकडाऊन जारी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री तथा बेंगळूर शहर कोविड नियंत्रणाची जबाबदारी घेतलेले प्रभारी आर. अशोक यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी तज्ञांशी चर्चा केली असून लॉकडाऊनबाबत त्यांचा कल आहे. राज्यात दहावी परीक्षा सुरू आहे. परीक्षा 4 जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत ठोस निर्णय घेणार आहेत. दरम्यान, बेंगळूरमध्ये व्यापार, व्यवसायांबाबत नियम कठोर करून त्याकरिता वेळमर्यादा घालून देण्याबाबत सरकार विचाराधीन आहे.
कोट्स….
राज्यात कोरोना नियंत्रणात
राज्यात कोरोना नियंत्रणात आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या महानगरांच्या तुलनेत बेंगळूरमधील रुग्णसंख्या कमी आहे. 3321 पैकी 433 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत.
– येडियुराप्पा, मुख्यमंत्री









