अधिकाऱयांची बैठक घेऊन दिल्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
नूतन पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी सोमवारी सकाळी सुत्रे स्वीकारली आहेत. मावळते पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी नव्या आयुक्तांकडे सुत्रे सोपविली.
रविवारी डॉ. त्यागराजन हे बेळगावात आले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात सोमवारी सकाळी त्यांचे आगमन होताच त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, यशोदा वंटगोडी आदींसह शहरातील अधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ बेळगावात पूर्ण केलेल्या डॉ. त्यागराजन यांनी शहरातील अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांना सुचना केल्या. सध्या कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. कोरोना थोपविण्याबरोबरच शहरातीला गुन्हेगारी थोपविण्यासाठी कोणती उपाय योजना करायची या विषयी त्यांनी अधिकाऱयांना मार्गदर्शन केले.
कोरोना विरुध्द लढताना पोलिसांनी स्वतःही सुरक्षित रहावे. यासाठी आवश्यक खबरदारी व काळजी घ्यावी. नागरिकांशी सौजन्याने वागावे. प्रामाणिकपणे नागरिकांची सेवा करताना निक्षपक्षपातपणा आत्मसात करावा, असा सल्ला नव्या आयुक्तांनी दिला आहे.









