नवी दिल्ली
भारतातील आघाडीवरची इकॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट येणाऱया काळात 300 उमेदवारांची भरती करणार आहे. देशभरातील आयआयटी, आयआयएमसह प्रसिद्ध महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांची भरती येणाऱया काळात फ्लिपकार्ट करणार आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत कंपनीचे भरतीचे प्रमाण 30 टक्के अधिक असणार आहे. तंत्रज्ञान आणि बिगर तंत्रज्ञान शाखेच्या महाविद्यालयांच्या कॅम्पसमधूनही यंदा उमेदवारांची भरती केली जाणार आहे. देशभरातील हुशार पदवीधर निवडण्याची किमया यंदाही फ्लिपकार्ट नेमाने पार पाडणार आहे.









