स्टार प्रवाहवर 7 डिसेंबरपासून सुरु होणार्या ’सांग तू आहेस का‘ या मालिकेद्वारे अभिनेत्री सानिया चौधरी पदार्पण करते आहे. मुख्य भूमिका असलेली ही तिची पहिलीच मालिका. लहानपणापासूनच सानियाला अभिनय आणि नफत्याची आवड होती. सानिया मुळची पुण्याची त्यामुळे पुण्यातच तिने नफत्य शिकण्यासोबतच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अनेक वर्कशॉप्स, नाटय़स्पर्धा आणि थिएटर केल्यानंतर तिला हिंदी वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सानियाचं टॅलेण्ट पाहून तिला स्टार प्रवाहच्या सांग तू आहेस का मालिकेसाठी ऑडिशनसाठी सांगण्यात आलं. पाच ते सहा वेळा ऑडिशन आणि लूक टेस्ट दिल्यानंतर तिची वैदेही या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली.
माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत असल्याचं सानिया सांगते. मालिकेचा प्रोमो ऑनएअर गेल्यानंतर मला खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. हॉरर आणि रोमान्स हा जॉनर मी पहिल्यांदाच करत आहे. त्यामुळे खूप उत्सुकता आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळेसोबत पहिल्यांदाच काम करते आहे. आम्ही तिघेही पुण्याचे असल्यामुळे आम्हा तिघांची खूप छान गट्टी जमली आहे. हीच केमिस्ट्री तुम्हाला मालिका बघताना नक्कीच जाणवेल. त्यामुळे आता उत्सुकता आहे 7 डिसेंबरची. नवी मालिका सांग तू आहेस का 7 डिसेंबरपासून रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.









