नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद उत्पादक कंपनी स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (सेल)नोव्हेंबरमध्ये 1.417 दशलक्ष टन इतक्या कच्च्या पोलादाचे उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन मागच्या वर्षाच्या नोव्हेंबरपेक्षा 7 टक्के अधिक आहे. 2019 च्या नोव्हेंबरमध्ये कंपनीने 1.238 दशलक्ष टन पोलादाचे उत्पादन घेतले होते. बाजारात विविध व्यवसायांनी गती घेतल्याने पोलादाच्या मागणीत अलीकडे वाढ दिसली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बांधकाम क्षेत्रानेही गती नोंदवली होती.









