प्रतिनिधी/ खंडाळा
भिडेवाडय़ात पाच मजली सावित्रीबाई फुलेची शाळा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु असुन अगामी काळात राज्यातील प्रत्येक जिह्यात सावित्रीबाई फुले वस्तीगृह स्थापन करणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना छगन भुजबळ यांनी नायगाव येथे बोलताना केली.
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे स्त्राr शिक्षणाच्या जनक जानज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा, आणि ग्रामपंचायत नायगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पार पडलेल्या कार्यक्रमास माहिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आ.पंकज भुजबळ , कल्याणराव आखाडे , जिल्हा परिषद सदस्या दिपाली साळुंखे,सभापती अश्विनी पवार, उपसभापती वंदनाताई धायगुडे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे,शारदाताई जाधव,स्वाती जमदाडे, समता परिषदेचे राजेंद्र नेवसे , शिवसेनेचे तालुका प्रमुख आदेश जमदाडे, दिवाकर गमे, प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव ,खंडाळ्याचे तहसिलदार दशरथ काळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, यांच्यासह विविध मान्यवर , खातेप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट देत फुले दांपत्याच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन केले. दरम्यान नुतन अशोक नेवसे यांना पीएचडी मिळालेबदल मंत्री भूजबळ व रुपालीताई चाकणकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले की , बहुजन समाजाला मार्गदर्शन करून समान हक्क मिळवून देण्याचे काम फुले दांपत्यांनी केले . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजातील घटकांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. छत्रपती शाहु महाराजांनी दलिताना प्रथम आरक्षण दिले . त्यांचा कित्ता गिरवित डॉ . आंबेडकरांनी स्वतंत्र भारतात दलित शोषिताना त्यांचे हक्क मिळवून दिले . आजही काही जणाना ’ फुल्यांची ’?लर्जी आहे . अथर्व वेद वाचन्याचा हक्क माहिलांना सावित्रीबाई फुलेमुळे मिळाला हे विसरून चालणार नाही . कर्मकांड करणे किवा इतर कामे करणे हा संबंधिताचा धंदा आहे.हे महात्मा फुले यांनी सागितले होते.आपण त्यांना विसरून चालणार नाही . छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहु महाराज , महात्मा फुले ,सावित्री फुले ,डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विसरून चालणार नाही .
महाज्योती या संस्थेच्या ताब्यात येथील पर्यटन केंद्र देऊन नायगांवच्या विकासासाठी प्रयत्न करु. सरकार मधील सर्व मंत्री चांगल्या कामाला सहकार्य करतात असे सांगत मंत्री भुजबळ म्हणाले , पुण्यातील भिडेवाडय़ात पाच मजली सावित्रीबाईं फुले यांची पहिली मुलीची शाळा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत . ओबीसी आरक्षणासंदर्भात आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत . महाराष्ट्र , . मध्य प्रदेश ओरीसा या राज्यात निवडणूकांमध्ये आरक्षण स्थगिती मिळाली आहे . इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे.ओबीसी समाज म्हणजे खाली बसलेला हत्ती आहे . त्याला कितीही टोचले तरी उठत नाही असे उत्तर प्रदेशचे नेते काशीराम म्हणत असत . या समाजाला अनेक सुविधा हव्या आहेत. मात्र यासाठी संघर्ष करायला हा समाज पुढे येताना दिसत नाही .
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की,माणुसकीचा व स्त्राr स्वातंत्र्याचा मंत्र देणाया फुले दांपत्याने सामाजीक भान बदलले . बचत गटाच्या माध्यमातुन महिलाच्यात विचार मंथन होते . त्यात आर्थिक सबलीकरण करणे हा विचार सावित्रीबाईंनी त्या काळात मांडला . तोच आपण आज घेऊन जात आहेत . सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंना दुष्काळ ,महिला अत्याचार,इग्रजी राजवटी संदर्भात त्यांनी तीन पत्रे लिहीली . ती आजही ताजी असल्याचे भासते. स्त्राr पुरुष समानता पाळलीच पाहीजे . समाजसेवेचा वसा आणि वारसा पुढे चालविणार्यांना अडचणी निर्माण करणारे अनेक विदुषक आजच्या समाजात पदोपदी आढळतात .








