जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण ; पहिल्याच दिवशी 100 टक्के लसीकरण
प्रतिनिधी/ सातारा
3 जानेवारीपासून भारतात 15 ते 18 वयोगटामधील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सातारा शहरातील शाहुनगर येथील गुरूकुल स्कूलच्या 15 ते 18 दरम्यान वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण’ करणारी गुरूकुल भारतातील पहिली शाळा ठरली आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष् चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणिस दीपक प्रभावळकर, मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, उपमुख्याध्यापिका अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, माध्यमिक विभागप्रमुख सोनाली तांबोळी व शिक्षक उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्हीही लस सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्यपरिणाम नाहीत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांचे आरोग्यास प्राधान्य देणे हे आपली नैतिक जबाबदारी समजून व लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शाळेमधील 15 ते 18 वय पूर्ण केलेल्या 166 विद्यार्थ्यांचे आज लसीकरण पूर्ण करण्यात आले. याचा मला मनस्वी आनंद होत आहे, याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांचे अभिनंदन करतो.
सदर लसीकरण मोहीमे प्रसंगी मधुकर जाधव, ऍड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, जगदिश खंडेलवाल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्वाती फणसे यांनी केले.








