गटारसाठी खोदाई सुरू असताना घडली घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
गटारसाठी खोदाई सुरू असताना जेसीबीमुळे भूमीगत गॅसवाहिनीला गळती लागली. सोमवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयासमोर घडलेल्या या घटनेने एकच धावपळ उडाली.
पोलीस आयुक्त कार्यालयासमोर गटारसाठी खोदाई सुरू आहे. भूमीगत गॅसवाहिनीला धक्का लागून गळती लागली. या प्रकाराने एकच धावपळ उडाली. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत दोन्ही बाजूने या मार्गावर बॅरिकेड्स उभे करुन वाहतूक उडविली. तातडीने गॅस कंपनीलाही यासंबंधीची माहिती देण्यात आली.
एका बाजूला आरटीओ सर्कलजवळ तर दुसऱया बाजूला एसपी ऑफीससमोर वाहतूक अडविण्यात आली होती. तब्बल अर्धा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. सुदैवाने या घटनेत कोणतीच हानी झाली नाही. यासंबंधी मार्केट पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता गॅस कंपनीच्या अधिकाऱयांनी फिर्याद देणार असल्याचे सांगितले आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.









