30 लाख रुपये रोकड, पिस्तुल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त, विशेष पथकाची कारवा
गेल्या 15 वर्षांपूर्वी बेळगाव, बागलकोट, विजापूरसह उत्तर कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिह्यात दहशत माजविणारी टायगर गँग पुन्हा सक्रिय झाली आहे. या गँगमधील 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ‘कोका’ (कर्नाटक संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा-2000) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे.
रामदुर्गचे पोलीस उपअधिक्षक शंकरगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. गेल्या 12 वर्षांपूर्वी खून, खुनी हल्ला, दरोडा, खंडणी वसुली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही जणांचा यामध्ये समावेश आहे. या टोळीकडून मोठय़ा प्रमाणात रोकड, शस्त्रs, मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.










