ग्रेटर नोएडा होणार भारताचे चेंगाई
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये खेळणी उद्योगाला चालना देण्यासाठीची घोषणा केली होती. या घोषणेचा सकारात्मक परिणाम म्हणून युपी सरकारकडे देशात खेळणी बनविणाऱयांनी जवळपास 92 प्रस्ताव दाखल केले आहेत. यामुळे लवकरच देशाचे ग्रेटर नोएडा हे खेळणी उद्योगाचे केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेमधून खेळणी उद्योगाला चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे. येणाऱया दिवसांमध्ये ग्रेटर नोएडामध्ये जेवर एअरपोर्टच्या जवळ खेळणी उत्पादनाचे केंद्र तयार करण्यात येणार आहे. परंतु आता ग्रेटर नोएडा भारताचे चेंगाई म्हणून उदयास येण्याच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
ऑगस्टमध्ये खेळणी उद्योगास सुरुवात करण्यात येणार असून या योजनेसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याकरीता 92 अर्ज सादर करण्यात आले आहेत. यासाठी जवळपास 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्याचा अंदाज आहे.









